नवी दिल्ली : सौम्य ते मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना वाहन चालक परवाना मिळावा यासाठी रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या फॉर्म 1 आणि फॉर्म 1 ए सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. 24 जून 2020 रोजीचा जीएसआर 401 (ई) मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला सामाजिक आणि सुविधाकारक नियमन आहे.
दिव्यांगजन नागरिकांना वाहतूक संबंधित सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि विशेष करून वाहन चालक परवाना मिळवण्याशी संबंधित सेवा मिळाव्यात यासाठी मंत्रालयाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दिव्यांगांना वाहनचालक परवाना मिळावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत आणि त्याशिवाय मोनोक्युलर दृष्टी असलेल्या लोकांसाठी यापूर्वी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी जाहीर करावी लागणारी शारीरिक तंदुरुस्ती(फॉर्म-1) किंवा वैदयकीय प्रमाणपत्र( फॉर्म- 1ए) यामधील निर्बंधांमुळे रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना वाहनचालक परवाना मिळवणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी मंत्रालयाकडे आल्या होत्या. हा मुद्दा वैद्यकीय तज्ञांच्या संस्थेकडे मांडण्यात आला होता आणि त्यावर त्यांचा सल्ला मागवण्यात आला होता.
त्यानुसार त्यांनी सौम्य ते मध्यम रंगांधळेपण असलेल्यांना वाहन चालवण्यास परवानगी देण्यात यावी आणि रंगांधळेपणाचा तीव्र दोष असलेल्या नागरिकांवर निर्बंध असावेत, अशी शिफारस या संस्थेकडून करण्यात आली होती. जगाच्या इतर भागांमध्ये अशा व्यक्तींना परवानगी देण्यात येते. त्यानुसार याबाबत सूचना आणि शिफारशी करण्यासाठी अधिसूचनेचा मसुदा जारी करण्यात आला.
सौम्य किंवा मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना देखील आता वाहन चालक परवाना मिळणार
Citizens with mild or medium colour blindness to also obtain Driving License now
📕https://t.co/aKFOVTmYlV pic.twitter.com/1fGmvWVfzB
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) June 26, 2020