नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या  सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ६६ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन देशभर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

आमच्या एआयआर न्यूज या संकेस्थळावरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल. प्रधानमंत्र्याच हे भाषण संपल्यानंतर लगेच त्याचा मराठी अनुवाद राज्यातल्या सर्व केंद्रावरुन प्रसारित होईल. याचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाईल.