नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस उद्या सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार असून आपण सहभागी होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेश कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार, ७ जूनपासून सातत्यानं दरवाढ करत आहे. देश गंभीर संकटाचा सामना करत असताना. केंद्र सरकार दरवाढ करुन नफेखोरी करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना दरवाढ करुन केंद्र सरकार जनतेवर अन्याय करत असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली.