मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकांकडून पीककर्ज मंजूर व्हावं यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत अशी मागणी बँक कामगार संघटनांनी केली आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि रिझर्व्ह बँकेनं पीककर्ज मंजूरीबाबत स्पष्ट निकष जाहीर करायला हवेत असं पत्र युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेनं मुख्यमंत्र्याला लिहिलं आहे. गेल्याच आठवड्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा दिला होता. यावर मत व्यक्त करत या संघटनानी सरकारच्या सर्व घोषणांना योग्य दिशा मिळायला हवी, त्याची चोख अंमलबजावणी व्हायला हवी अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.