नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी गुंतवणूकदारांनी जून महिन्यात २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक स्थानिक बाजारात केली आहे. यामुळे बाजारात खेळतं भांडवलं वाढलं असून अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याचं गुंतवणूक अभ्यासक संस्थांनी म्हटलं आहे.

याकाळात विदेशी संस्थांनी शेअर बाजारात २२ हजार ८९३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र त्यातून १ हजार ६५८ कोटी त्यांनी काढून घेतले. विशेष म्हणजे आधीच्या सलग तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून आपला पैसा काढून घेण्याचा सपाटा लावला होता.