नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून दिल्लीत डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. पेट्रोलच्या दरामधे लीटरमागे पाच पैसे तर डिझेलच्या दरामधे लीटरमागे १३ पैशांनी वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ८० रुपये ४३ तर डीझेलचा दर ८० रुपये ५३ पैसे प्रति लीटर झाला आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८७ रुपये १९ पैसे या भावाने तर डीझेल ७८ रुपये ७१ पैसे या भावाने मिळत आहे. गेल्या तेवीस दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.