नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या गिरगाव इथल्या प्रकल्प बांधितांसाठी इमारत बांधण्यात येत आहे. त्यासाठी मागवलेल्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो-तीन प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवासी, व्यावसायिक आणि कार्यालयांचं पुनर्वसन गिरगावातल्या इमारतीत करण्यात येणार आहे. या ४८ मजली इमारतीत ४७३ निवासी सदनिका, १३७ व्यावसायिक आस्थापनं, आणि १९ कार्यालयं असतील.

या कामासाठी निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला असून या पुनर्विकसित इमारती  काळबादेवी आणि गिरगाव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या संलग्न बांधण्यात येणार असल्याचं, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनचे संचालक रणजित सिंह देईल यांनी सांगितलं. या प्रकल्पाच   यानं या भागातल्या सामुहिक विकासाला चालना मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.