नवी दिल्ली : संपूर्ण वीज देयक एकरकमी भरल्यास, राज्य सरकार देयकात दोन टक्के सूट देणार असल्याचं, ऊर्जा मंत्री नीतीन राऊत यांनी जाहीर केलं आहे. ते आज वीज देयकासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत होते.

टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता, सरासरी वीज वापराच्या आधारे वीज देयकं देण्यात आली होती, मात्र जे लोक घरांना कुलूप लावून गावी गेले होते, त्यांच्या घरी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन देयकात दुरुस्ती केल जाईल, असं राऊत यांनी सांगितलं.

वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळेही या काळात वीज देयक अधिक आलं असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.