नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतीय औषध महानिदेशालयानं कोवॅक्सीनची चाचणी मानवी शरीरावर करण्याची परवानगी दिली आहे. हैदराबाद इथल्या भारत बायोटेकनं या लसीची निर्मिती केली आहे.
पुढच्या महिन्यापासून या लसीच्या चाचणीला सुरवात होईल. सध्या ही लस निष्क्रीय म्हणजे स्थीर स्वरूपात आहे, पण तिच्या रासायनिक परिणामांनी वैद्यकीय क्षेत्रात आशा निर्माण केली आहे.