नवी दिल्‍ली : UPSC  अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०२० सालची पूर्व परीक्षा  तसंच २०२० सालची भारतीय वनविभाग सेवा  परीक्षा देणाऱ्या  उमेदवारांना आपलं  परीक्षा केंद्र निवडण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत उमेदवारांनी केलेल्या विनंतीची नोंद घेऊन UPSC नं हा निर्णय जारी  केला आहे.

परीक्षा केंद्र बदलण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर  ७ जुलै ते १३ जुलै आणि २० जुलै ते २४ जुलै या दोन टप्प्यांमध्ये सोय उपलब्ध होणार आहे. यात सर्व प्रथम विनंती करणाऱ्या सर्व प्रथम परीक्षा केंद्र बदलून मिळेल. त्यामुळं संबंधित परीक्षा केंद्राची क्षमता पूर्ण झाल्यावर त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळं त्यांना इतर केंद्रासाठी अर्ज करावा लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना १ ते ८ ऑगस्ट दरम्यान परीक्षा अर्ज मागे घेण्याचीही संधी दिली जाणार आहे.