नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना गेल्या चोवीस तासात 20 हजार 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना मुक्त झालेल्यांची एकंदर संख्या तीन लाख 79 हजार 892 झाला आहे. देशात कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 60 पूर्णांक 72 शतांश टक्के झाला आहे. गेल्या चोवीस तासात देशात 20 हजार 903 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख 25 हजार 544 झाली असून, एकूण 2 लाख 27 हजार 439 रुग्ण सकारात्मक आहेत. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. काल एका दिवसात देशात 379 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 18 हजार 213 झाला आहे.
दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासात दोन लाख 41 हजार 567 कोरोना चाचण्या झाल्याचं राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनं म्हटलं आहे. कोरोना साथीचा उद्रेक झाल्यापासून करण्यात आलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. आतापर्यंत देशात 92 लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक हजार 74 प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली असून यात 775 सरकारी तर 299 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.