नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय.सी.एम.आर. नं कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानकांप्रमाणं आहे. त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते, असं स्पष्टीकरण आय.सी.एम.आर. अर्था भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिलं आहे. ही लस विकसित करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचंही आय.सी.एम.आर. नं म्हटलं आहे.
आपण विकसित करत असलेली लस संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. यासाठी सखोल तपासणी केल्यानंतरच देशाच्या औषध नियंत्रकांनी पहिल्या आणि दुसऱ्या टपप्यांच्या चाचण्यांची परवानगी दिली आहे. नागरिकांच्या गरजेसाठी चाचण्यांची गती वाढविणं गरजेचं आहे. त्यामुळं लालफितीचा कारभार टाळण्यासाठी पत्र लिहून जलद गतीनं चाचण्या करायला सांगितल्याचं आय.सी.एम.आर. नं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी कुठलीही आवश्यक प्रक्रिया टाळायला सांगितलं नसल्याचं आय.सी.एम.आर.नं म्हटलं आहे.