नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत येलदडमी जंगलात काल संध्याकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एक नक्षलवादी ठार झाला. या जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना पोलिसांवर गोळीबार सुरु झाला.
पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्यावर नक्षलवादी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका नक्षलवाद्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक आणि इतर साहित्य ताब्यात घेतलं आहे.