नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम असून अधिकृत म्हणून सतत निरनिराळी माहिती मिळत राहिली तर या आजारावर भारत कसा नियंत्रण मिळवू शकेल, असा सवाल काँग्रेसनं केला आहे.
लोकांनी रोगाविरुद्ध सक्षमपणे लढण्यासाठी सरकारनं रोगाविषयी वस्तुनिष्ठ माहिती द्यायला हवी, असं काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितलं.
दिल्लीतल्या रुग्णालयांनी कोरोना बळींची संख्या ९२ सांगितली असली तरी सरकार मात्र मृतांची संख्या ६८ सांगत असून दिल्ली सरकारनं आकडेवारी जाहीर करण्याबाबत पारदर्शी असावं असं माकन यांनी म्हटलं आहे.