नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवीच्या आजाराच्या निर्मूलनाला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रानं टपाल तिकिटाचं अनावरण केलं आहे.  १९८० च्या मे महिन्यात ३३ व्या जागतिक आरोग्य परिषदेत देवीच्या आजाराचं जगभरातून संपूर्ण निर्मूलन झाल्याचं अधिकृत पत्रक जारी केलं होत.

जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधानोम घेब्रायसस यांनी सांगितलं की १९६७ मध्ये देवी निर्मूलन मोहिमेला सुरुवात झाली तेव्हा लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक देशांनी टपाल तिकिटाचीच मदत घेतली होती. आता अनावरण केलेल्या टपाल तिकिटाच्या प्रकाशनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे अवर महासचिव अतुल खरे यांची मोलाची मदत झाल्याचं घेब्रायसस यांनी म्हटलं आहे.