नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेटीएम या पेमेंट्स बँकेला नवी खाती उघडायला भारतीय रिझर्व्ह बँकेनं मनाई केली आहे. याबाबतचा आदेश रिझर्व्ह बँकेनं काल जारी केला. हा आदेश तात्काळ प्रभावानं लागू केला असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
पेटीएम बँकेच्या पर्यवेक्षणात काही दस्तावेजांसंबंधी शंका वाटत असल्यानं, ही कारवाई केली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. पेटीएम बँकेनं, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षणविषयक संस्थेची नियुक्ती करून, आपल्या माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचं लेखापरिक्षण करून घ्यावं असे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत.
माहिती तंत्रज्ञान लेखापालांचा अहवाल मिळाल्यानंतरच, नव्या खातेदारांविषयीचा निर्णय घेतला जाईल असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.