नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंचन प्रकल्पातल्या उपलब्ध पाणी साठ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी या जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक असून यासाठी सर्व बाबी तपासत फेरनियोजनाचा प्रस्ताव करायचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू दिले आहेत.

प्रकल्पांतर्गत परिसरात जमा होणारी वाळू सिंचनाच्या प्रकल्पासाठी वापरण्यात यावी, तसंच सर्व बाबींचा विचार करून सुधारित पाणीपट्टी दर तयार करण्यात यावं, असे त्यांनी सांगितलं. राज्यात सिंचनाचं प्रमाण वाढविण्यासाठी पैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा. त्यामुळे विविध विभागांतल्या शेतीला फायदा होईल तसाच पेयजलाचाही प्रश्न सुटेल, असे कडू यांनी सांगितलं.