सातारा : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून बऱ्यांच रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमध्ये पाणी साठून राहत यासाठी उपाययोजना करुन व सर्व प्रमुख मार्गांचे व पुलांचे तातडीने सुरक्षा लेखा परिक्षण करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले.
जिल्ह्यातील रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यासह विविध अशासकीय सदस्य उपस्थित होते.
ब्लॅकस्पॉटवरील उपाययोजनांचा आढावा घेऊन अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, नवीन ब्लॅकस्टॉप निर्माण होणार यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी गठीत केलेल्या समितीने दिलेल्या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करुन रस्ता सुरक्षेबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व कराड यांनी केलेल्या उपाययोजनांचा तसेच उद्दिष्टांचा आढावा वेळोवेळी द्यावा, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी शेवटी केल्या.