नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्रीय विद्यालय संघटनेनं विशेष तरतुदीअंतर्गत दिले जाणारे प्रवेश थांबवले आहेत. या विशेष तरतुदीमधे खासदार कोट्यातून दिल्या जाणाऱ्या प्रवेशांचाही समावेश आहे. केन्द्रीय विद्यालय संघटनेच्या निर्देशानुसार पुढचा आदेश येईपर्यंत विशेष तरतुदीअंतर्गत विद्यार्थ्याचे प्रवेश होणार नाहीत.
राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आत्तापर्यंत प्रत्येक खासदार आणि प्रत्येक जिल्हाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या कोट्यातून केन्द्रीय विद्यालयात विद्यार्थ्याना प्रवेश देऊ शकत होते.
खासदार कोट्यातून ७ हजार ५०० विद्यार्थी, आणि जिल्हाधिकारी कोट्यातून २२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत होता.