नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्याबाबत अमेरिका प्राधान्यानं विचार करत आहे, असं परराष्ट्रमंत्री माईक पॉमपीओ यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची माहिती चीन सरकारला देण्यात आली असल्याचं पॉमपीओ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. टिकटॉक अँपमुळे वापरकर्त्यांची माहिती गोपनीय रहात नसल्यानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचत असल्याचा दावा अमेरिकेतील कायदेतज्ञांनी केला आहे.

चीनमधील स्थानिक कंपन्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामकाज करत असल्यानं धोका वाढत असल्याचं मत या तज्ञांनी व्यक्त केलं आहे. हॉंगकॉंगमधील चीनचा ह्स्तक्षेप आणि व्यापारी युद्ध या पार्श्वभूमीवर कोरोना साथीबाबत अमेरिका आणि चीन यांच्यातील संबध अधिक तणावपूर्ण होत आहेत.