नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज पहिल्यांदाच भेट दिली. जिनपिंग यांनी कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वूहानची राजधानी हुबेई इथं सुरु असलेल्या नियंत्रण कक्षाची आणि इतर उपाययोजनांची पाहणी केली.

दरम्यान, चीनमधे गेल्या चोवीस तासात कोरोना विषाणूमुळे 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तिथल्या आरोग्य विभागानं दिली आहे. यामुळे एकट्या चीनमधल्या मृतांची संख्या तीन हजार 136 इतकी झाली आहे, तर 80 हजार 754 कोरोनाचे संशयित रुग्ण आहेत.

सुमारे 17 हजार 721 जणांवर उपचार सुरु असून, 59 हजार 897 रुग्णांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.