नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या तीन साथीदारांना अवंतीपोरा पोलिसांनी काल अटक केली.

पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना साहित्य आणि इतर मदत केल्याचा त्यांच्यावर संशय आहे.

त्राल पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते.