नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल १९ हजार ८७३ कोरोनाबाधित बरे झाले असून, बरे झालेल्यांची  एकूण संख्या ५ लाख १५ हजार ३८६ झाली आहे. सध्या २ लाख ८३ हजार ४०७ कोरोनाबाधितांवर देशभरात उपचार सुरू आहेत.

देशभरात काल २७ हजार ११४ नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून, एका दिवसातली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे.

देशभरात काल ५१९ कोरोना मृत्यूंची नोंद झाली असून कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २२ हजार १२३ झाली आहे. देशातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६२ पूर्णांक ७८ शतांश टक्के, तर मृत्युदर २ पूर्णांक ६९ शतांश टक्के इतका आहे.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या, महाराष्ट्रात सर्वात जास्त असून,  दिल्ली दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.