मुंबई : नागरिकांचे सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग व महापालिका प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात कोविडचा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नाला यश आले. याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

कोविड साथरोगाचा संसर्ग धारावीमध्ये रोखण्याचे मोठे आव्हान होते. या साथीच्या नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाने स्थानिकांना सोबत घेऊन चाचण्यांचे नियोजन केले. धारावीमध्ये संपूर्ण चाचण्यांवर भर देण्यात आले. प्रत्येक घरात जाऊन तपासण्यांवर भर दिला. त्यामुळे रुग्ण वाढण्याच्या प्रमाणावर, नियंत्रण करण्यावर भर दिला.

कोरोना संसर्गाच्या ट्रेसिंगसाठी विशेष टीम तयार करण्यात आल्या. कंटेंन्मेंट झोनमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. धारावीतील स्थानिकांचे सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व प्रशासनाचे नियोजन यांच्या एकात्मिक प्रयत्नांमुळे धारावीतील कोविडवर नियंत्रण मिळवता आले. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.