पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्‍युसन महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  येथील  फर्ग्‍युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित  “चरैवेति !चरैवेति!!”(जर्मन अनुवाद) या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले.

यावेळी  उत्‍तर प्रदेशचे राज्‍यपाल राम नाईक, महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्‍यसभा सदस्‍य खा. डॉ. विनय सहस्‍त्रबुध्‍दे, लोकसभा सदस्‍य खा.गिरिश बापट, महापौर मुक्‍ता टिळक,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्‍ल पवार, डे.ए.सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ.चिं.ग.वैद्य, फर्ग्‍युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डे.ए.सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुलसचिव प्रफुल्‍ल पवार यांनी मानले.