नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इन्कार केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमधे त्यांनी हे स्पष्ट केलं.

लोकशाहीमधे आपण कायम सत्तेवर राहू असा विचार राजकीय पक्षांनी करू नये, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही पराभव स्वीकारावे लागले असल्यानं राजकीय नेत्यांनी मतदारांना गृहीत धरू नये, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामधे राज्यातील टाळेबंदीवरून मतभेद असल्याच्या वृत्ताचं त्यांनी यावेळी खंडन केलं.