नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवली जात असताना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुबईत एसबीआयनं आयोजित केलेल्या एका उपक्रमामधे बोलत होते.

देशातल्या बँका आणि अर्थव्यवस्था सद्यस्थितीचं आव्हान पेलण्याची क्षमता बाळगून असल्याचं त्यांनी नमूद केलं. रिझर्व बँकेनं टाळेबंदीच्या या काळामधे बँका थेट प्रभावित होऊ नयेत यासाठी योजलेल्या उपायांचा उपयोग झाल्याचं दास यावेळी म्हणाले.