नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर गेली आहे. देशभरात काल ३४ हजार ९५६ रुग्ण वाढले. आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्यांची एकूण संख्या १० लाख तीन हजार ८३२ झाली आहे.

यापैकी ६ लाख ३५ हजार ७५६ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ६३ पूर्णांक ३३ शतांश टक्के आहे.

देशात सध्या ३ लाख ४२ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना विषाणुमुळे काल ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला. तयामुळे कोरोनाबळींची संख्या आता २५ हजार ६०२ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.