नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी काल भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं राऊत यांनी बातमीदारांना सांगितलं. शिवसेनेनं सत्ता स्थापनेची संधी सोडू नये, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
दरम्यान, योग्य कालावधीत सरकार बनू शकलं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकेल. राज्य घटनेतल्या तरतुदींनुसार कारवाई करावी लागेल, असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.