नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात आजपासून ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय ‘व्यापार मेळा’ सुरु झाला. व्यवसाय सुलभता ही यावर्षीची संकल्पना आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी या मेळ्याचं उद्धाटनं केलं.

१४ दिवस चालणा-या या मेळ्यात ऑस्ट्रेलिया, इराण, इंग्लंड, व्हिएतनाम, बहारीन, बांगलादेश, भूतान, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया यांच्यासह अनेक देश सहभागी झाले आहेत. यावेळी अफगाणिस्तान हा भागीदार देश असून दक्षिण कोरिया केंद्रस्थानी असेल.बिहार आणि झारखंड या रांज्यांवर विशेष भर असेल.