नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२२ मध्ये होणार्‍या बॅर्मिंगहॅम क्रीडा राष्ट्रकूल स्पर्धेच्या रोस्टरमधे नेमबाजीचा पुन्हा समावेश करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघ नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार आहे.

ऑलिंपिक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा आणि महासचिव राजीव मेहता यांच्याबरोबर क्रीडा मंत्री किरन रिजीजू राष्ट्रकूल क्रीडा महासंघाच्या अध्यक्ष लुईस मार्टीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड ग्रेविम बर्ग यांची भेट घेऊन नेमबाजीला वगळयाबद्दल निषेध व्यक्त करणार आहे. व्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक आयोजन समितीनं नेमबाजीला राष्ट्रकूल स्पर्धेतून वगळलं आहे.