मुंबई : नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे थांबलेलं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम पुन्हा सुरु झालं आहे, मात्र १२ हजार ५९ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, अशी माहिती नांदेड इथल्या भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखाहून जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असून त्यांच्या  खात्यात रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे. तेव्हा उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार मोहनराव  हंबर्डे यांनी केलं आहे.