भोसरी : नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्या वतीने दर महिन्याला ई मासिकाचे प्रकाशन केले जाते. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवादिनी “काव्यातील नक्षञ” मासिकाच्या नवव्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा” संपन्न झाला. यावेळी अँड. प्रफुल्ल भुजबळ म्हणाले की, “नक्षत्राचं देणं काव्यमंच समाजातील संवेदना जपणारी संस्था आहे. कवींसाठी वेगवेगळी उपक्रम राबवून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळून देत आहे. कार्यक्रमातील विविधता हे सुध्दा संस्थेने जपले आहे. भविष्यातील कवींना महाराष्ट्रातील एकमेव व्यासपीठ असावे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा..!”

नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे हे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षत्र” आहे. कवींच्या हक्काचे, सन्मानाचे, आदराचे व्यासपीठ “नक्षञाचं देणं काव्यमंच” होय. २१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम यशस्वी केले आहे. ई मासिकाच्या माध्यमातून कवी-कवयित्रिंना लिहिते करुन, त्यांच्या कवितांना यात स्थान दिले आहे. “काव्यातील नक्षत्र” हे विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते. त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घेऊन, अनेकांना पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा. प्रकाशक सोहळा  सुप्रसिदध समाजसेवक,काव्यप्रेमी, राजज्योतीषरत्न पुरस्कार प्राप्त मा. अँड. प्रफुल्ल भुजबळ (मार्गदर्शक व आधारस्तंभ “नक्षञाचं देणं काव्यमंच”,पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

प्रकाशन सोहळा विशेष अतिथी

मा.समाजसेवक शिक्षणतज्ञ ह.भ.प.डाॅ.रवींद्र सोमंशी (प्राध्यापक-पोलादपूर-रायगड) व प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे, मा.कविवर्या सौ.शारदा लोंढे-कट्टर नक्षञ, (अमेरीका-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्य अनिल जाधव-कट्टर नक्षञ (दुबई-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्य श्री.महेश मोरे-कट्टर नक्षञ (सिंगापूर-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्या दया घोंगे (कट्टर नक्षञ-डोंबिवली-विभागप्रमुख-नक्षञाचं देणं काव्यमंच) यावेळी प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मा.कविवर्य श्री. शाहू संभाजी भारती (संपादक-डिजीटल शैक्षणिक दैनिक-रयतेचा वाली व उपसंपादक-काव्यातील नक्षञ), मा.कविवर्य रमेशकुमार नांगरे-कट्टर नक्षञ (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्या सौ.सरस्वती घाडगे -कट्टर नक्षञ ( माढा -सोलापुर नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्य दिलीप विधाटे-कट्टर नक्षञ (मावळा तालुकाप्रमुख-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्य शिवनाथ गायकवाड-कट्टर नक्षञ (कन्नड तालुकाप्रमुख, नक्षञाचं देणं काव्यमंंच) यांच्या उपस्थित हा प्रकाशन सोहळा, युवा दिनानिमित्त उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संयोजक-संपादक प्रा.राजेंद्र सोनवणे कवी – वादळकार, पुणे यांनी केले.