नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी, थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी, २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण कर्जमाफी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२१ ही आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. यामधे जे लोक दोन वर्षापेक्षा जास्त थकित असतील त्यांच्या मुद्दलावरती फक्त वीस टक्के रक्कम भरून त्यांना कर्जमुक्त होता येते. तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो.