नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहचू शकतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागानं दिला आहे .
कोरोनाची साथ देशभर पसरल्यानंतर गेल्या सुमारे ५ महिन्यांच्या कालावधीत सॅनिटायझरचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याचं निदर्शनास आल्यामुळंच आरोग्य विभागाने हा सल्ला दिला आहे.
साबण आणि पाण्याचा पर्याय जिथं उपलब्ध नाही केवळ त्याच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा अन्यथा साबणाने स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे .
सॅनिटायझरच्या अतिरेकी वापरानं त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणूही मरतात आणि मग हातावर फोड येण्यासारखे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.