नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोचवत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारनं चीनच्या आणखी ४७ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या शुक्रवारी जारी करण्यात आला होता असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

नव्यानं बंदी घातलेल्या अॅपची कोणतीही अधिकृत यादी किंवा निवेदन उपलब्ध नसल्याचंही वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे बंदी घातलेल्या चीनच्या एकूण मोबाईल अॅपची संख्या १०६ झाली आहे.