पुणे : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता शासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून राज्य शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशास अनुसरुन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयांतर्गत असणा-या शिबिर कार्यालयाकडील कामे वगळता उर्वरित सर्व कामे शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे तसेच पक्की अनुज्ञप्ती चाचणी इ.कामे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करुन सुरु करण्यात आले आहे.
शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्तीच्या ऑनलाईन अपाँईटमेंट कोटा मध्ये 30 जुलै 2020 पासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 29 जुलै 2020 पासून शिकाऊ अनुज्ञप्ती करीता दुपारी 4 वा. व पक्की अनुज्ञप्ती करीता दु.5 वाजता ऑनलाईन अपॉईटमेंट घेता येईल.
शिकाऊ अनुज्ञप्ती पूर्वीचा कोटा -42 बदल झालेला कोटा- 63 व पक्की अनुज्ञप्ती पूर्वीचा कोटा – 70 व बदल झालेला कोटा – 115 याप्रमाणे सर्व नागरिकांना सुचीत करण्यात येते की 29 जुलै 2020 पासून वरीलप्रमाणे चाचणीकरीताचा स्लॉट बुक करुन त्याप्रमाणे पूर्वनियोजित वेळेनुसार उपस्थित राहण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.