मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून भाविकांसाठी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं करण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल रखुमाईचं दर्शन हे भाविकांसाठी २४ तास खुलं असणार आहे.

दरम्यान कोरोनापश्चात दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येनं वारकरी येतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तयारी केली आहे. दररोज १ लाखांहून अधिक भाविकांना विठूरायाचं दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मंदिर समितीनं दर्शन रांगेची उभारणी केली आहे.