नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात ही घोषणा केली आहे.

तसेच सॅनिटरी नॅपकिनसोबत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिशवी देणं उत्पादकांना पुढच्या वर्षीच्या जानेवारीपासून बंधनकारक होणार आहे. सॅनिटरी नॅपकिन उत्पादकांना प्रत्येक नॅपकिन बरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे. परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नसल्याने हे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितलं.

यांसारखे छोटे-छोटे उपक्रमच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करायला मदत करतील असे ते म्हणाले.