नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 10 लाख 26 हजारपेक्षा अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 14 कोटी 88 लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. देशात सध्या कोरोना पॉझीटीव्ह होण्याचा दर 2 पूर्णांक 59 शतांश टक्के आहे. देशात सध्या 2 हजार 210 प्रयोगशाळा कोरोनाचाचण्या करत आहेत.

देशात कोरोनारूग्णांची संख्या कमी होत असून 91 लाखाहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार टक्क्याच्या खाली आली आहे. काल 39 हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले असून 15 हजार पेक्षा कमी नवे रूग्ण आढळले असल्याच आरोग्य विभागानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे देशात 385 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.