नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये आज लसीकरण सुरू होत असून कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लसीकरण मोहीम राबविणारा हा पहिला देश ठरणार आहे.

देशातल्या डॉक्टरांना लशीचं वितरण करण्यापूर्वी ती सरकारी रुग्णालयांमध्ये आधी उपलब्ध केली जाणार आहे. ब्रिटननं गेल्या आठवड्यात फायझर आणि बायो एनटेक या कंपन्यांनी विकसीत केलेल्या लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

लसीकरण मोहीम राबवताना आरोग्य सेवक आणि ८० च्या पुढे वय असलेले नागरिक यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ब्रिटननं चार कोटी डोसची मागणी नोंदवली आहे.