नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बौद्धमय असताना साकेत नगरी म्हणून प्रसिद्द असलेल्या अयोध्येत एखाद्या ठिकाणी भव्य बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे तसचं मस्जिद ला ही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. असही ते म्हणाले.
त्यासाठी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेऊन त्याचप्रमाणे एक ट्रस्ट उभारून बुद्ध विहार बांधण्याचा प्रत्यत्न करणार असल्याचंही त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.