नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात बी सी सी आय नं, सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना प्रमाणित कार्य पद्धती  जारी केल्या आहेत. यानुसार, स्थानिक प्रशासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर क्रिकेट प्रशिक्षण सुरु करता येईल.

बी सी सी आय नं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार,  प्रशिक्षण सुरु करताना, कोविड-१९ आजारातील धोका ज्ञात असून, ही  जोखीम  स्वीकारत असल्याचं खेळाडूला लिखित स्वरुपात देणं बंधनकारक असणार आहे.

त्याचप्रमाणे, खेळाडू तसंच मैदानाबाहेरील कर्मचार्यांनी देखील, आरोग्य विभागाने जारी केलेल्या सुरक्षा उपायांचं  काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडे दिलेल्या जन्मतारखेमध्ये एखाद्या क्रिकेट खेळाडूनं फेरफार केल्याची कबुली दिल्यास ती  सुधारण्याची संधी देण्यात आहे. हा  बदल येत्या १५ सप्टेंबर पूर्वी स्वतःहून कळवल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं मंडळानं म्हटलं आहे.

त्यानंतर केलेल्या तपासणीत जर कुणा खेळाडूनं असा प्रकार केल्याचं आढळून आलं तर मात्र  त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मंडळानं दिला असल्याच पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.