मुंबई : देशातील पहिल्या क्रमांकाचा सर्व्हिस रोबोट ब्रँड मिलाग्रोने, मिलाग्रो आयमॅप मॅक्स, मिलाग्रो आय मॅप १०.० आणि मिलाग्रो सीगल हे तीन नवे रोबोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. या सर्वांमध्ये मिलाग्रोच्या मालकीचे सॉफ्टवेअर ‘आरटी२आर’ – रिअल टाइम टेरेन रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. भारतातील स्थितीच्या व्यवस्थापकीय पद्धती लक्षात घेऊन ३ वर्षे संशोधन आणि विकासासाठीचे परिश्रम घेऊन हा रोबोट तयार करण्यात आला आहे. हे रोबोट अॅमेझॉनच्या प्राइम डे सेलमध्ये ६-७ ऑगस्ट रोजी लाँच केले जातील.
मिलाग्रो आयमॅप मॅक्स हा जगातील पहिला फ्लोअर वेट मॉपिंग आणि व्हॅक्युमिंग रोबोट हा स्वत:च ४० एनच्या प्रेशरने स्वत:चा मॉप स्वच्छ करतो. हा पूर्णपणे स्वतंत्र, सेल्फ-क्लिनिंग रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर असून ओल्या मॉपद्वारे स्वच्छ करण्याचे तंत्र आहे. ते एआय अल्गोरिदमवर आधारीत असून मॉप खाली येतो दोन हायड्रॉलिक शाफ्ट्सद्वारे फरशीवर १० एनचे प्रेशर देतो. या अतिरिक्त दाबामुळे फरशीवरील कॉफी, सॉस आदींसारखे हट्टी डाग आणि घाणही स्वच्छ केले जातात. आयमॅप मॅक्समध्ये नवी स्नेल टच साइड ब्रश सुविधा वापरली आहे. याद्वारे कोप-यासारख्या अवघड ठिकाणांचीही स्वच्छता होते. रोबोटमध्ये पुन्हा वापरण्यायोग्य १ लिटर डस्ट बॅग असून यूझर्स त्याला पर्यायी डिस्पोजेबल बॅगही जोडू शकतात.
मिलाग्रो आयमॅप १०.० हा इलेक्ट्रॉनिक वॉटर टँकसह, ३ तासांचे बॅटरी लाइफ, सर्वात शक्तीशाली २७०० पीएच्या सेक्शन असलेला सेल्फ नेव्हिगेटिंग रोबोट पूर्णपणे स्वयंचलित आहे. अत्यंत सूत्रबद्ध असलेल्या या आयमॅप १०.० मध्ये आयमॅप लिडार तंत्रज्ञान असून ते अत्यंत काटेकोर काम करते. याद्वारे ८ एमएमपर्यंतच्या अचूकतेसह १६ मि, २१६०/सेकंदाच्या रिअल टाइममध्ये वास्तविक नकाशे तयार केले जातात. तब्बल १८ सेंसर्स असलेला हा रोबोट त्याच्या मार्गाचे नियोजन वेगाने करू शकतो. तसेच यूझरच्या मोबाइल स्क्रीनवर स्वच्छ केलेला आणि उर्वरीत भाग रिअल टाइममध्ये दाखवू शकतो. आयसीएमआरच्या शिफारशीनुसार, आयमॅप १०.०मधील इलेक्ट्रॉनिक वॉटर टँकमध्ये सोडियम हायपोक्लोराइट १% सोल्युशन घेता येईल, अशी सुधारणा केली असून याद्वारे कोव्हिड-१९सारखे विषाणू नष्ट केले जातात.
मिलाग्रो सीगल गायरो मॅपिंग फ्लोअर क्लिनिंग रोबोटची उंची फक्त ७.२ सेंटीमीटर एवढी आहे. मिलाग्रो सीगलमध्ये ओरिएंटेशन ठरवण्यासाठी ‘गायरो मॅपिंग’ तंत्रज्ञान आहे. मिलाग्रो सिगलमध्ये फरशी स्वच्छ करतेवेळी रिअल टाइममध्ये प्रगती आणि नकाशा यूझर्सच्या डिव्हाइसवर दर्शवला जातो. घेतलेला वेळ आणखी कमी करण्यासाठी प्रत्येक भागातील रिअल टाइममधील मार्ग रोबोटद्वारे शोधले जातात. अँटी-बॅक्टेरिया, अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल (०.५ मायक्रॉन्स) प्रॉपर्टीजद्वारे मिलाग्रो सीगल हे हॉस्पिटल आणि तत्सम वातावरणातील संसर्गगाचा प्रसार कमी करण्यास मदत करते.
मिलाग्रो रोबोट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री राजीव करावाल म्हणाले, “सध्या घर, कार्यालय, रुग्णालय, हॉटेल्स इत्यादीमध्ये साथीच्या आजारामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, हे ३ ‘व्हाइट रोबो-नाइट्स’ बनवण्यात आले आहेत. कारण स्वच्छता आणि निर्जंतूकीकरणाची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. फरशीवर दाबाने मॉपिंग करणे, त्यानंतर स्वत:च्या मॉपची स्वच्छता करणारे हे जगातील पहिले रोबोट असून यात रिअल टाइम टेरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी वापरली आहे. .याद्वारे भारतीय बाजाराला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, याची आम्हाला खात्री आहे.