मुंबईतील धारावी स्थित असलेल्या “धारावी युनायटेड”ने कोविड १९ संकटाच्या काळात आपले अनुभव व्यक्त केले .
“चेंज चॅम्पियनस” नागरिकांना पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करत आहेत.
मुंबई : ११ ऑगस्ट रोजी पॉप्युलेशन फर्स्ट आणि यूएनएफपीए यांनी कॅनडिंड कॉन्व्हर्सशन विथ चेंज चॅम्पियन्स” हा व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यांनी कोविड -१९च्या काळात सुरक्षा, लिंग समानता आणि त्यांच्या मदतीसाठी अनुकरणीय योगदान कसे संकल्पित केले व त्यांचे कुटुंब आणि वडीलधारी मंडळी सुरक्षित राहण्यास कशी मदत केली या बद्दल त्यांचे वैयक्तिकअनुभव सांगितले.
सृष्टी बक्षी, संस्थापक, क्रॉसबो माईल्स मूव्हमेंट, दीपक रमोला, संस्थापक आणि कलात्मक संचालक प्रोजेक्ट फ्युएल, धारावी युनायटेड आणि हवामान बदलावरील युथ अॅडव्हायझरी ग्रुप, युनायटेड नेशन्स या संस्थेच्या सदस्य अर्चना सोरेग हे चार प्रेरणादायी चेंज चॅम्पियन्सने आपले प्रेरणादायक प्रवास सादर केले.
“यावर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा विषय ‘युथ एंगेजमेण्ट एक्टिव फॉर ग्लोबल एक्शन’ हा असून युवा पिढीमध्ये पर्यावरणाच्या बदलांविषयी स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून आहेत. भारत आता हवामान बदलांविषयी बोलण्याच्या दृष्टीने इतर देशांशी तितकीच स्पर्धा करीत आहे आणि जगाला राहण्यासाठी एक चांगले स्थान बनण्यास मदत करते. मला वाटते शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे जी देशाच्या विकासास मदत करेल आणि जेव्हा शिक्षणास विज्ञानाची जोड असेल तर सर्व व्यावसायिक प्रशिक्षण आणि जीवन कौशल्य आपल्या जीवनात बदल घडवून आणतील,”असे यूएनएफपीएचे देश प्रतिनिधी अर्जेंटीना मटावेल पिसिन यांनी सांगितले.
“धारावी युनायटेड” हा एक रॅप क्रू असून ते वयाच्या १४ व्या वर्षापासून हिप हॉपचे म्युझिकचे प्रतिनिधित्व करीत आहे. कोविड -१९ वर रॅपच्या माध्यमातून धारावीतील जनजागृती करण्यासाठी व फ्रंटलाइन कामगारांना मदत करण्यासाठी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.धारावी युनाइटेडचे, टोनी आणि राजेश म्हणाले, “कोविड १९ च्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने धारावी हॉट स्पॉट बनल्याने सर्व बंद होते. म्हणून आम्ही फोनवर व्हिडिओ बनवून कोविडबद्दल जागरूकता पसरविण्याचा विचार केला आणि आम्ही परिस्थितीशिवाय कसे वागू शकतो याचा विचार केला. जसजसे तरुण मुलं आमचे संगीत ऐकतात, तसतसे आम्हाला वडीलधारी मंडळी आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे आवश्यक आहे आणि आपण आपले जीवन कसे वाचवू शकतो हे त्यांना समजून घेणे आम्हाला सोपे झाले.” याच सत्राबरोबरच टोनी व राजेश यांचे एक लाइव्ह रॅप गाण्यावर चेन्नई येथील सेल्फ थॉट व्हिज्युअल आर्टिस्ट एन. घनप्रिया यांचे लाइव्ह पेंटिंग होते.
ओरिसा स्थित अर्चना सोरेंग ह्या (UN) संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार समूहाद्वारे नामित भारतातील एक हवामान कार्यकर्ता आहे. यामध्ये कोविड -१९ च्या पुनर्प्राप्तीचा एक भाग म्हणून वाढत्या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील तरूण नेत्यांना दृष्टीकोन आणि उपाय देतील अर्चना म्हणाल्या,”मी ओडिशाच्या आदिवासी खेड्यातील असल्याने आमच्यासाठी जंगल खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा लॉकडाऊन जाहीर केले गेले, तेव्हा जंगलाला वाढू देण्याचा हंगाम सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये गावकर्यांना या हंगामात पिकलेली फळे आणि भाजीपाला शहरांमध्ये लोकांना विकून आपला उदार निर्वाह करण्यास सोपे झाले. कारण लॉकडाऊनमुळे शहरांमध्ये लोकांना स्वत:साठी खाद्यपदार्थ खरेदी करण्यात अडचणी येत होत्या आणि येथे ग्रामस्थांनी त्याऐवजी जंगलातील भाजीपाला वापरला. म्हणूनच आम्हाला हे समजले की आपले जंगल आणि पर्यावरण सुरक्षित आणि मुबलक राखणे किती महत्त्वाचे आहे.”
पॉप्युलेशन फर्स्टच्या संचालिका डॉ. ए एल शारदा म्हणाल्या, “या कोविड काळात हे युवा लोकसेवा आणि असुरक्षित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यात अग्रस्थानी आहेत. ज्या युवकांना जगात बदलावं आण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना प्रोसाहन दिले पाहिजे.आम्ही त्यांचे अनुभव देशभरातून मोठ्या संख्येने तरुणांनापर्यन्त पोहचवून त्यांना प्रेरित करण्यासाठी व त्यांना बदल घडवण्यासाठी प्रवृत्त करत आहोत.