नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला परवानगी दिली आहे. यामध्ये पुण्यातली विद्यापिठं, महाविद्यालयं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा त्याचप्रमाणे राज्यस्तरीय संशोधन केंद्र तसचं संशोधन आणि विकास संस्थांबरोबरच प्रमुख औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे. ही माहिती पुणे क्लस्टरचे संचालक अजीत केमभावी यांनी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
प्रमुख वैद्यानिक सल्ला कार्यालयातर्फे परवानगी दिलेलं हे देशातलं पहिलं नॉलेज क्लस्टर असल्याचंही ते म्हणाले. पुणे नॉलेज क्लस्टरवर विद्यार्थी तसचं तरुण व्यवसायिकांमध्ये विविध क्षमता निर्माण करण्याचीही जबाबदारी असेल. याप्रकारच्याच हैद्राबाद आणि जोधपूर क्लस्टरलाही परवानगी देण्यात आली आहे.