मुंबई (वृत्तसंस्था) : जम्बो कोविड सेंटर तयार करण्याऐवजी ५० ते १०० खाटांची व्यवस्था असलेली छोटी-छोटी कोविड केंद्रं तयार केली तर त्याचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना आणि विविध वॉर्डामध्येही होऊ शकतो, असं मत विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं.
फडनवीस यांनी काल मुंबईतल्या कांदिवली इथं पावनधाम कोविड रुग्णालय आणि दहीसर चेक नाका इथल्या छोट्या कोवीड रुग्णालयाला भेट दिली. त्या नंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. या रुग्णालयात ८५४ रुग्ण दाखल झाले, त्यापैकी ७५४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. इथल्या व्यवस्थे विषयी फडनवीस यांनी समाधान व्यक्त केलं.