नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2019 रोजी मथुरा येथे पशुंच्या पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस साठी राष्‍ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान राष्‍ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम सुरु करणार आहेत.

पंतप्रधान मोदी पशु विज्ञान आणि आरोग्‍य मेळाव्यात देखील सहभागी होणार आहेत. बाबूगढ़ सेक्‍स सीमेन सुविधा आणि देशातील सर्व 687 जिल्ह्यांमध्ये कृषि विज्ञान केंद्रांमध्ये कार्यशाळांचा शुभारंभ करणार आहेत. कार्यशाळेचा विषय आहे- लसीकरण आणि रोग नियंत्रण, कृत्रिम गर्भधारणा आणि प्रजनन

पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस साठी राष्‍ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम 100 टक्के केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. यासाठी 2019 ते 2024 कालावधीसाठी 12,652 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. लसीकरणाच्या माध्यमातून 2025 पर्यंत पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस नियंत्रित करणे आणि 2030 पर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.