नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “ईद-उल-जुहा निमित्त सर्व देशवासियांना विशेषतः देशातील तसेच परदेशातील मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो.
ईद-उल-जुहा प्रेम, बंधुभाव आणि मानवतेप्रती सेवेचे प्रतीक आहे. आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सार्वत्रिक मूल्यांप्रति आपण स्वतःला समर्पित करूया.”