नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते  होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय निवृत्त लेफ्टनंट  जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ प्राजक्ता काळे यांना मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.